
- वैयक्तिक मत (अनिल भील )
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण च्या जन्म शक्यता येथून होत असावे …
नंदुरबार जिल्हा हा बहुल आदिवासी लोकसंख्येच्या क्षेत्र आहे या नंदुरबार जिल्हा रोजगाराची जास्त प्रमाणात कमतरता आहे. आणि शिक्षणाचे प्रमाण देखील खूपच कमी असते. काही ठळक मुद्दे आहेत जसे की बेरोजगारी ही सर्वात मोठी या नंदुरबार जिल्ह्याची आदिवासी लोकांची मोठी समस्या आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील बरेच आदिवासी कुटुंब कामाच्या शोध घेत परप्रांतीय राज्यात स्थलांतर दरवर्षी होतात म्हणून शालेय शिक्षण देखील मुलांचे कमी होत जाते.
यावर्षी पर प्रांतात काही आदिवासी मजूर यांच्या देखील मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती सर्पदंशाने एका महिन्याच्या मृत्यू झाला होता तसेच पर प्रांतात उघड्यावर राहणे थंड वारात राहणे.
म्हणून काही मुलांमध्ये व महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण या नंदुरबार जिल्ह्यात वाढताना दिसतो या नंदुरबार जिल्ह्यात शेतीय कामे जास्त काळ उपलब्ध नसून काही काळासाठी लोकांना गुजरात या राज्यात स्थलांतर मजूर होताना दिसतो लगभग एका गावातून दरवर्षी शंभर ते दीडशे मजूर स्थलांतरित होतात..
ते परप्रांतात कसे राहतात त्यांची राहणीमान.
ते शेतात किंवा गावाच्या गावठाणात लहान लहान ताडपत्रीच्या झोपड्या करून राहतात.
कुपोषणाचे मुख्य कारणे
आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती मुळे अनेक लोक अन्य राज्यात काही महिन्यासाठी वास्तव्यास असतात म्हणून महिलांमध्ये व मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक वाढतांना दिसतो.
मनरेगा चे कामे हवे तसे उपलब्ध नाही जर मनरेगा चे कामे जास्त प्रमाणात उपलब्ध राहिली असती तर लोक पर प्रांतात स्थलांतर झाले नसते..
कुपोषणाचे रोजगार हे मुख्य कारणीभूत घटक आहे जर या नंदुरबार जिल्ह्यात रोजगार उपलब्ध झाला तर कुपोषण काही प्रमाणात कमी होताना दिसून येईल कारण हिवाळ्याच्या दिवसात परप्रांतात आदिवासी शेतमजूर हे उघड्यावर राहणे व हवामान बदलावामुळे लहान मुलांना व महिलांना कुपोषीत बनवत असतं.
कुपोषण नष्ट करण्याच्या काही ठळक मुद्दे..
मनरेगा या योजनेत वाढ करणे.
अंगणवाडीमध्ये चांगल्या दर्जाचे पोषक आहार देणे.
शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे.
स्थानिक लोकांना स्थानिक पातळीवर कामे उपलब्ध करून देणे यामुळे कुपोषणापासून मुक्तता काही प्रमाणात मिळू शकतो.