श्रीमंतांना लूट आणि गरिबामध्ये वाटा असा जननायक क्रांतिकारक भारतीय रॉबिनहुड -टंट्या भिल…
प्रतिनिधी -अनिल भिल

श्रीमंतांना लूट आणि गरिबामध्ये वाटा असा जननायक क्रांतिकारक भारतीय रॉबिनहुड -टंट्या भिल…
समाजासाठी खूप मोठा योगदान टंट्या भील यांच्या होता तरीही कितीही आदिवासी समाजाचे समाजसेवा करणारे क्रांतिकारक क्रांती घडवून आणली तरीही आज आदिवासींच्या इतिहास दडपला गेलेला दिसून येतो.
जसे श्री आप गुलाम बाबा यांचा इतिहास देखील नंदुरबार जिल्ह्यातील धडपला गेला रावला पाणी इतिहास ब्रिटिशांनी अनेक आदिवासी बांधवांवर गोळीबार केली होती तरीही आज देखील शालेय पुस्तक पाठ्यपुस्तकात नमूद नाही असा अनेक आदिवासी समाजाचे क्रांतिकारक होऊन गेले पण मात्र त्यांच्या इतिहास पूर्ण तत्त्वावर उल्लेख केलेला हवा तसा दिसून आला नाही तसेच आज ४ डिसेंबर टंट्या भिल यांच्या बलिदान दिवस होय. सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेल्या अत्याचार पाहून टंट्या भिल्ल मनामध्ये एक रागव्देष उसळला होता त्यांनी गावागावात जाऊन जनजाती समाजाचे युवकांची अनेंक सेना तयार केली ही सेना जनतेला लुटणाऱ्या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरुद्ध लढत होती तंट्या मामा या लोकांची संपत्ती लूटत आणि गोरगरिबांमध्ये वाटून टाकत असा उद्देश होता कोणत्याही संकट काळात ते त्यांच्या मदतीला धावून जात लोकांच्या सुखदुःखात सामील व्हायचे समरस झाल्यामुळे त्याच्याविषयी लोकांच्या मनात आदर निर्माण झाला आणि ते जनतेत मामा म्हणून संबोधले जाऊ लागले अकरा वर्षांच्या काळात सावकार मालगुजारांच्या कर्दनकाळ बनलेला तसेच झोप उडवणारा एकमेव असा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता अकरा वर्षे ब्रिटिश सत्तेच्या तोंडाचे पाणी तंट्या मामा भिल्ल यांनी पळवले होते ज्या काळात पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले समाज सुधारण्यासाठी कार्यरत होते त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी ब्रिटिशांना विरुद्ध लढा देत होता. टंट्या मामा भिल्ल यांना पकडण्यासाठी दहा हजार पाचशे रुपये 25 एकर जमिनीचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले होते. याच्यावरूनच असे कळते की टंट्या मामा भिलने किती त्रास ब्रिटिशांच्या सत्तेला दिला असेल हे आपल्या लक्षात या इतिहासावरूनच कळतो शेवटी इंग्रजांनी षड्यंत्र रचून त्यांना पकडले आणि इंदूरला आणले त्यातून त्यांना जबलपूर जेलमध्ये आणले गेले शेवटी ४ डिसेंबर १८७९ ला त्यांना फाशी दिली निर्गुण पणे त्याचे शव पाताल पाणी जवळ एका रेल्वे रूळावर फेकून दिले आज हि तेथे त्याचे समारक आहे म्हणून चार डिसेंबर जननायक तंट्या भिल्ल क्रांतिकारक बलिदान दिवस पूर्ण श्रद्धा आणि आस्था म्हणून साजरा केला जातो इंदोरच्या पाताल पाणी रेल्वे स्टेशन जवळ असं एकमेव रेल्वे स्टेशन आहे येथे एका क्षणा साठी रेल्वे नक्कीच थांबते. ब्रिटिश सरकारांना अकरा वर्षेपर्यंत त्यांनी ब्रिटिश सरकारच्या हातात तुरी देत होता परिस्थिती चांगले असलेले लोकांना लुटून गरिबांमध्ये वाटत होतात प्रत्येक गावोगावी त्यांनी संघटना स्थापन करून ब्रिटिश सरकार यांना हाकलून टाकण्याचे काम टंट्या मामा भिल्ल यांनी केले होते खूप मोठे योगदान समाजासाठी दिले आहे. आणि त्याला अटक करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक कारणास्थान रचली होती तरी अकरा वर्षेपर्यंत ब्रिटिश सरकारच्या हाताला तुरी देत होता असा एकमेव तंट्या मामा भिल म्हणून आज देखील त्या रेल्वे रुळावर काही सेकंदातही रेल्वे थांबते आणि तेथे अभिवादन केले जाते असे आदिवासी समाजाचे अनेक असे क्रांतिकारक होऊन गेले आणि समाजासाठी खूप मोठे योगदान दिले तरी आज आदिवासी समाजाचा इतिहास दडपला गेलेला दिसून येतो.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील आप श्री. गुलाम बाबा महाराज यांच्या इतिहास देखील दडपला गेलेला दिसून येतो.
आज देखील ब्रिटिश कालीन गोळीबार दगडावरचा खुणा तळोदा तालुक्यातील रावला पाणी येते आहेत त्या ठिकाणी अनेक आदिवासी बांधव यांच्यावर गोळीबार करण्यात आल्या होत्या अनेक समाज बांधव यांनी आपले प्राण गमावले होते. आज अनेक असे समाज बांधव आहेत त्यांना ४ डिसेंबर म्हणजे काय १५ नोव्हेंबर म्हणजे काय? ९ ऑगस्ट का साजरा केला जातो म्हणजे काय ? असे अनेक प्रश्न आहेत जे समाज बांधवांना आजपर्यंत माहित नाही कारण पाठ्यपुस्तकासो की शालेय पुस्तक असो नोंद असणे गरजेचे आहे कारण समाजातील तरुणांना आपल्या क्रांतिकारक बद्दल माहीत असणे आवश्यक आहे.त्या महान वीरांना क्रांतिकारकांना सतत नमन.
✍️(अनिल भील) आदिवासी एक्स्प्रेस नंदुरबार…………………..
……………………….