मोबाईल वरून नोंदवा आता निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

जिल्हाधिकारी ; सी -व्हिजन सिटीझन मोबाईल अॕप वरून तक्रारीची सुविधा
नंदुरबार : जर आचारसंहिता भंग होत असल्यांचे दिसताच नागरीकांनी थेट सी- व्हिजन सिटीझन अॕपवर ऑनलाईन तक्रार नागरिकांनी करावी १०० मिनिटात पहिली कारवाई केली जाते या बाबत मोठ्या प्रमाणात जनतेत जनजागृती करून नागरिकांना या अॕप बद्दल अवगत करून द्यावे अशी सुचना जिल्हाधिकारी डाॕ मिताली सेठी यांनी निवडणूक यंत्रणेला दिल्या आहेत.
आचारसंहिता चा कालावधीत काय करता येते काय करता येत नसते या मुद्द्यावर निवडणूक उमेदवार,प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते, तसेच काही वेळा आचारसंहितेचा उल्लंघन होत असते यामुळे तक्रार करण्याकरीता पुर्वी पेक्षा आता सुलभ झाले आहे.
प्रशासनापर्यत कसं पोहचता येईल यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी – व्हिजन अॕप विकसित केले आहे. या मोबाईल अॕपच्या माध्यमातून मतदारांना आता थेट तक्रार करता येणार आहे.
तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जातात
अॕपचा कसा वापर करावा
अॕड्राॕइड,आयओएस डिव्हाईस वरून डाउनलोड करावे.
आपला मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून आपलं खातं तयार करून घ्यावे.
तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची असेल तेथील स्थळ छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचं तपशील टाकावे. त्यानंतर तक्रार समाविष्ट करा.तसेच १९५० या टोल फ्री क्रमांकावर देखील आपली तक्रार नोंदवून शकता असेही देखील जिल्हाधिकारी डाॕ. मिताली सेठी यांनी सांगितले आहे.