
सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ #प्रकाशा येथे पूर्वतयारीस प्रारंभ
प्रकाशा (शहादा) दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या आयोजनच्या अनुषंगाने गौतमेश्र्वर मंदिर, प्रकाशा येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत काल स्थळाचे निरीक्षण करण्यात आले होते. कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी व नियोजनासाठी हे निरीक्षण करण्यात होते..
भाविकांच्या सोयीसुविधा कोणत्या प्रकारच्या उपलब्ध करण्यात येऊ शकतील या बद्दल सर्व नियोजन बदल चर्चा करून पुर्व तयारीस सुरूवात करण्यात आली..
गोमाई नदी काठावर वसलेले गौतमेश्वर महादेव मंदिरात येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो.
उपस्थित मान्यवर…
उपस्थित मान्यवर…
शहादा तहसिलदार दीपक गिरासे माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील सरपंच राजनंदिनी भील ग्राम महसूल अधिकारी डी. एम. चौधरी सिंहस्थ पर्वणी कार्यकर्ते सतीषचंद्र चौधरी, प्रशांत पाटील, मनोज पाटील, पवन चौधरी ग्राम विस्तार अधिकारी बी. जी. पाटील प्रकाशा ग्रामस्थ सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७च्या आयोजनासाठी महत्त्वाची तयारी सुरू पायाभूत सुविधा उभारणी व नियोजन रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन पार्किंग आणि गर्दी नियंत्रण उपाययोजना स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुविधा आरोग्य सेवा आणि आपत्कालीन मदत व्यवस्था सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था नियोजन भाविकांसाठी निवास व आवश्यक सुविधा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय साधून, भाविकांसाठी उत्तम व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन कटिबद्ध!
तसेच प्रकाशा क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून देखील ओळख आहे केदारेश्वर मंदीर ला श्रावण महिन्यात व महाशिवरात्री ऋषीपंचमी ला देखील मोठी भाविकांची गर्दी होत असते व तसेच संगमेश्वर महादेव मंदीर देखील आहे या ठिकाणी तीन नद्यांचा संगम झालेला आहे तापी,गोमाई,पुलिंदा यांच्या संगम आहे याचं तीन नद्या पैकी गोमाई नदीच्या काठावर गौतमेश्वर महादेव मंदीर असुन येथे कुंभमेळा भरत असतो. तसेच तापी नदीचा पलीकडील काठावर म्हणजे कोरीट या गावानजीक सिध्देश्वर महादेव मंदिर आहे येथे पण भाविकांची मोठी गर्दी असते.
सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ प्रकाशा सज्ज