ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृहमतदान नंदुरबार जिल्ह्यात गुरूवारपासून सुरू.
ट्रायबल एक्स्प्रेस नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात प्रथम व्दितीय फेरीत चार दिवस गृहमतदान गुरूवारपासून सुरू..
ते कोणासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी हि सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
ट्रायबल एक्स्प्रेस नंदुरबार ; जिल्ह्यात १ हजार १६४ जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदानासाठी पात्र.
नंदुरबार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांना व्यक्तींना घरून गृह मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात गुरुवार 14 नोव्हेंबर पासून गृह मतदानास सुरुवात होणार आहे सलग चार दिवस दोन फेरीत रविवार 17 नोव्हेंबर पर्यंत हे मतदान होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे.
८५ वर्षावरील नागरिक आणि दिव्यांगणा घरून मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने करून दिली आहे.
जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा,नंदुरबार, नवापूर या चार मतदार संघासाठी गृह मतदानाची पहिल्या फेरीची भेट ही १४ व १५ नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितिय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी 85 वर्षावरील जेष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत 12 डी फाॕर्म भरून घेतला आहे या फाॕर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील एक हजार 164 मतदार गृह मतदानासाठी पात्र ठरले आहेत
85 वर्षावरील जेष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये ; अक्कलकुवा-२२१ शहादा- २५७ नंदुरबार-३८३ नवापूर २८५
असे एकूण १ हजार १६४ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत तसेच गृह मतदानासाठी विधानसभा क्षेत्रात एकूण ४७ पथके तयार करण्यात आली आहे गृह मतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी ही पथके जाऊन पोस्टल व बॅलेट द्वारे मतदान करून घेणार आहेत गृह मतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येणार आहे.मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार असून गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे.